Ad will apear here
Next
रंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम


पुणे : ‘असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सिऑफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या रंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे मुख कर्करोग आणि हेल्मेट वापराविषयी जनजागृती मोहीम, तसेच मशाल पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.

हा कार्यक्रम आझम कॅंपसमधील एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेज येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते. ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी  विभागाचे प्रमुख डॉ. जे. बी. गारडे यांनी कुलगुरूंना रंगूनवाला डेंटल हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या मुख कर्करोगविषयक संशोधनाची आणि हेल्मेट नसल्याने झालेल्या अपघातग्रस्तांवर केलेल्या शस्त्रक्रियांची माहिती दिली.



‘रंगूनवाला डेंटल हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या मुख कर्करोगविषयक संशोधनाला आंतरराष्ट्रीय सहयोग मिळावा, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रयत्न करेल,’ असे आश्वासन डॉ. करमळकर यांनी या प्रसंगी दिले.

या वेळी लतीफ मगदूम, प्राचार्य रमणदीप दुग्गल, डॉ. हर्षद भागवत, डॉ. सोनी, डॉ. गौरव खुटवड, डॉ. अश्विनी वडणे उपस्थित होते. मुख कर्करोगविषयक जनजागृतीसाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘ये पान हमे इस मोड पे ले आया’ हे पथनाट्य सादर केले. कुलगुरूंनी त्यांचे कौतुक केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZTTBW
Similar Posts
रंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे मशाल पदयात्रा पुणे : असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सिलोफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया यांच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या रंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे मुख कर्करोग जनजागृती मोहीम आणि हेल्मेट वापराविषयी १० जानेवारी २०१९ रोजी मशाल पदयात्रा काढण्यात आली. आझम कॅंपस, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेटमार्गे
इनामदार महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषद पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘व्हिजन इंडिया २०३०’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले असून, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या हस्ते १८ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे
अल्पसंख्याक समाजातील गुणवंतांचा सत्कार पुणे : राज्यभरातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी, सीख या अल्पसंख्याक समाजातील दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार अवामी महाज या सामाजिक संस्थेतर्फे तसेच हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
‘एमसीई’तर्फे पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे २१ नोव्हेंबर रोजी ईद-ए-मिलाद, पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या अभिवादन मिरवणुकीचे हे १४ वे वर्ष आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language